अनोळखी आजोबांच्या मदतीला श्रीनाथ धावले, अनोळखी प्रांतांतदेखील माणुसकीच्या दर्शनाने आजोबा गहिवरले!

सामाजिक कार्याचा वसा घेतलेले काही कार्यकर्ते स्वत :ला कामात मनापासून झोकून देतात कोरोनाच्या काळात प्रशासनाला मदत करण्यासाठी हेल्पिंग हँडचे अनेक कार्यकर्ते पुढे आले होते
रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या कोविड चाचणी केंद्रावर हेल्पिंग हँडसचे सदस्य नियमितपणे मदतकार्य करत आहेत. त्यामध्ये अमोल श्रीनाथ यांचा समावेश आहे. रेल्वेतून उतरल्यानंतर . एकाचवेळी अनेक प्रवासी येत असल्याने तपासणीसाठी त्यांची रांग लावणे, योग्य ते मार्गदर्शन करणे, तेथील उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना आवश्यक ती मदत करण्याचे काम ते करतात.
रत्नागिरी रेल्वे स्थानकात अमोल श्रीनाथ यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि स्वयंसेवक आलेल्या प्रवाशांची नोंद करत होते. तेवढ्यात तेथे एक आजोबा त्याठिकाणी आले त्यांचे हात थरथरत होते त्यांची स्थिती पाहून श्रीनाथ पुढे आले त्यांनी त्यांची चौकशी केली काम मिळवून देतो या आशेनं त्यानं कुणीतरी राजापूरला नेतो असे सांगून त्यांना अर्ध्या वाटेतच सोडले होते त्यांचे नाव सिंग असल्याचेही त्यांनी सांगितले वेगळा प्रांत भाषेची अडचण यामुळे आजोबा भांबावले होते त्यानं बिहार येथे आपल्या मुलीकडे जायचे होते परंतु त्यांच्या खिशात एकही पैसा नव्हता त्यांची ही अवस्था पाहून अमोल श्रीनाथ यांना घेवून तिकिट काऊंटरवर गेले. तेथे चौकशी केली असता पाटण्याला जाणारी थेट गाडी काल नव्हती, एका टीसीने सल्ला दिला की मुंबईत कुर्ला येथून दुसर्‍या दिवशी दुपारी दोन वाजता पाटणा विशेष गाडी आहे. काळाचा विलंब न करता तात्काळ आजोबांना रात्रौ सुटणार्‍या मत्स्यगंधा एक्स्प्रेसचे रत्नागिरीहून कुर्ल्यापर्यंतचे आणि पुढे कुर्ला ते पाटणा गाडीचे रिझर्व्हेशन तिकीट तेथेच काढून दिले. एवढ्यावरच श्रीनाथ थांबले नाहीत त्यांनी आजोबांना रेल्वे कॅन्टीनमध्ये नेऊन जेवू घातले त्यांना जेवू घातले श्रीनाथ यांच्या मदतीमुळे आजोबांना धीर आला व एक आधार मिळाल्यासारखे वाटू लागले. त्यांना घेवून रात्री ११ वा. श्रीनाथ यांनी आजोबांना रेल्वेत बसवून दिले व पुढे कुर्ला येथे उतरून पुढील प्रवास कसा करावा, हे समजून सांगितले.श्रीनाथ यांनी दिलेल्या आपुलकीमुळे आजोबांना गहिवरून आले व जाते वेळी श्रीनाथ यांना मनापासून आशीर्वाद दिला अडचणीत सापडलेल्या मदतीचा हात पुढे करून अमोल श्रीनाथ यांनी अनमोल कामगिरी बजावली !
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button