सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या “आपली पंचक्रोशी निरोगी पंचक्रोशी” या उपक्रमांतर्गत धामापूर तर्फे संगमेश्वर गावात मुलांसाठी मोफत आरोग्य शिबीर

सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या “आपली पंचक्रोशी निरोगी पंचक्रोशी” या उपक्रमांतर्गत धामापूर तर्फे संगमेश्वर गावात वालावलकर रुग्णालय डेरवण च्या माध्यमातून ० ते १४ वयोगटातील मुलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.सर्व मुलांची मोफत तपाणी व गरजेप्रमाणे मोफत औषधे सुद्धा वितरित करण्यात आली.
कोरोनामुळे जवळपास बंद असलेल्या वाहतूक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वाडीतून फाउंडेशन च्या कार्यालयापर्यंत पोचण्यासाठी वालावलकर ट्रस्ट तर्फे मोफत वाहनव्यवस्थेची सुद्धा सोय करण्यात आली होती.
याप्रसंगी कोरोनविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन कवळे गेले.
धामापूर गावातील धनावडे वाडी,बोल्ये-पडये वाडी,ढोपरखोल वाडी,तांबडवाडी,राऊळवाडी तसेच करजुवे गावातील चांदीवडे वाडी व डावलवाडी मधील बहुसंख्य पालकांनी व मुलांनी या सेवेचा लाभ घेतला. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिबिराची वेळ अडीच तासांनी वाढवण्यात आली व सर्व मुलांची तपासणी करूनच शिबिराची सांगता करण्यात आली.
धनावडे वाडीतील श्री. प्रभाकर धनावडे,उत्साही युवा किर्तीराज सगवेकर,तांबडवाडीचे वाडी प्रमुख श्री महादेव पडये ,अंगणवाडी सेविका सुरेखा शहाणे, दर्शना धनावडे,वैष्णवी धनावडे,संध्या पारधी,उज्वला देवरुखकर तसेच वेगवेगळ्या वॉर्ड मधील ग्रामपंचायत सदस्यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.
संगमेश्वर तालुक्यातील सर्वात मोठा गाव असा नावलौकिक असलेल्या धामापूर गावातील जवळपास ४०% लोकसंख्या असलेला भाग या शिबिरामुळे व्यापला गेला.उरलेल्या भागासाठी जुलै महिन्यात वेगळे शिबीर घेण्यात येईल असे या प्रसंगी फाउंडेशन चे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.
अत्यन्त अडचणीच्या काळात गावामध्येच मुलांची मोफत तपासणी व औषधोपचार झाल्यामुळे सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व सुवर्णसूर्य फाउंडेशन तसेच वालावलकर रुग्णालया चे आभार मानले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button