जि.प. पदाधिकारी व अधिकारी उतरले थेट शेतकऱ्यांच्या शेतात
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष विषय समिती सभापती, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, खातेप्रमुख यांनी थेट चिखलाच्या शेतात उतरून भाताची लवणी केली. परराज्यातील असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी बैलांचा नांगर धरून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी मोहीम सप्ताहाचा समारोप निवळी गावात झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, सभापती सौ. रेश्मा झगडे, परशुराम कदम, सौ. जंजना माने, उपसभापती उत्तम सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, पंचायत समिती सदस्या सौ. साक्षी रावणंग, निवळी सरपंच वेदिका रावणंग, उपसरपंच विलास गावडे या सर्व मान्यवरांनी भाताची लावणी केली. जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी नांगर धरल्याने निवळी पंचक्रोशीवासियांनी समाधान व्यक्त केले.
www.konkantoday.com