आपत्तीत मदतीसाठी धावून येणाऱ्या बावनदी येतील तरुण कार्यकर्त्यांच्या टीमचे कौतुक
घाटात झालेला अपघात असो किंवा नदीत बुडालेली व्यक्ती असो, अशा आपत्तीत मृतांना शोधण्याचे अवघड काम बावनदी पंचक्रोशीतील सुमारे २२ ते २५ कार्यकर्ते निवळी बौद्धवाडीतील रमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे करत आहेत. काही दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील सप्तलिंगी नदीत बुडून मृत्यू झालेल्या विनायक गीते यांचाही मृतदेह या कार्यकर्त्यांनी अवघ्या दीड ते दोन तासात शोधून काढून पोलीस यंत्रणेला सहकार्य केले.
रमेश सावंत, संजय खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ही टीम गेल्या अनेक वर्षांपासून तळमळीने हे काम करत आहे. कुठेही अपघात झाला असेल आणि त्या अपघातात अडकलेल्या व्यक्ती किंवा अडकलेलेे मृतदेह काढण्यासाठी पोलिसांची किंवा अन्य नागरिकांची मदतीची हाक देताच धावून जाते.
www.konkantoday.com