
डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून श्री. नितीन ढेरे सहा पोलीस निरीक्षक, जयगड पोलीस ठाणे तसेच पोलीस कर्मचारी यांचे तर्फे शासकीय रुग्णालयातील व खाजगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्सचा करण्यात आला सत्कार
गेले दीड वर्ष जगात कोरोनाने थैमान घातलेले असताना आणि या कोरोनाच्या महामारीत अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत असताना, स्वतः च्या जीवाची पर्वा न करता जगातील अनेक डॉक्टर्स या रुग्णांची सेवा करून रुग्णांना बरे करायचा प्रयत्न करत आहेत. या काळात डॉक्टरांवर अनेक प्रकारचे ताण असतात. काहि डाँ .तर आठ ते दहा महिने आपल्या घरी गेलेले नाही . कुटुंबाची काळजी लहान मुले याही परिस्थितीत आपला सेवाधर्म जाणून अनेक डॉक्टर्स सेवा देत आहेत. कोव्हिड च्या पेशंटवर आपल्या रुग्णालयात उपचार देत आहेत.कोव्हिड रुग्णालयातही आपली सेवा देत आहेत.कोव्हिड काळात इतर आजारांवर उपचार करून पेशंट ना दिलासा देण्याचे मोठे कार्य करीत आहेत.
डॉ. श्रुती कदम, व डाँ .सोनल व्हटकर प्रा.केंद्र वाटद खंडाळा,डॉ श्री.आशय जोशी जयगड, डॉ.श्री. नितीन कलंबटे, या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
www.konkantoday.com