
२६६ रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून १ हजार १९९ अधिकारी/कर्मचाऱ्यांकरिता ३१ बसेसची व्यवस्था
रत्नागिरी, दि.१५: (जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी २६६ रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून २६३ दापोली, २६४ गुहागर, २६५ चिपळूण, २६७ राजापूर या मतदार संघांमध्ये जाणाऱ्या निवडणूक कर्तव्यार्थ नेमण्यात आलेल्या १ हजार १९९ अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी एकूण ३१ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.
१९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ४.३० वाजता थिबा पॅलेस रोड येथून ९ बसेस ३६० अधिकारी/ कर्मचाऱ्यांना घेवून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीकडे जाणार आहेत. सकाळी ५.३० वाजता थिबा पॅलेस रोड येथून २६० अधिकारी/कर्मचाऱ्यांना घेवून ७ बसेस विश्वनाथ विद्यालय, लवेल घरडा इन्टिबाट्यूट शेजारी, ता. खेड येथे जाणार आहेत. सकाळी ६ वाजता थिबा पॅलेस रोड येथून २७२ अधिकारी/कर्मचाऱ्यांना घेवून ८ बसेस चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलकडे जाणार आहेत. तसेच सकाळी ६.३० वाजता थिबा पॅलेस रोड येथून ३०७ अधिकारी/कर्मचाऱ्यांना घेवून ७ बसेस आबासाहेब मराठे कॉलेज, राजापूर (विखारेगोठणे) कडे जाणार आहेत.