
गुहागरमध्ये ग्रामस्थांनी पकडले अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन
गुहागर : येथील समुद्रकिनार्यावर अनेक दिवस मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जात होता. बुधवारी पहाटे गुहागर शहर बाग परिसरात समुद्राची पांढरी वाळू भरून वाहतूक करणारे वाहन काही ग्रामस्थांनी अडवले. वाळू उपसा व वाहतुकीचा हा प्रकार महसूल विभागाच्या निदर्शनात आणून दिला व कारवाईची मागणी केली. या समुद्रकिनारी चालणार्या वाळू उपशाकडे वेळीच नियंत्रण न केल्यास अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वाळू वाहतूक करणार्या वाहनांवर महसूल विभाग कशा प्रकारे कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात संबंधित व्यक्तीला दंडाची नोटीस बजावण्यात आली असल्याचे तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी सांगितले.