घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल २५ रुपयांनी वाढ
कोरोना महामारीची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असली तरी महागाईची लाट मात्र कायम आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल २५ रुपयांनी वाढ झाली असून, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे चक्र सुरूच आहे. महागाईच्या भडक्यामुळे जनता पूर्णपणे त्रस्त झाली आहे.
महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्र पेट्रोल प्रतिलिटर १०२ते १०५ रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेल शंभरीच्या उंबरठय़ावर आहे. जून महिन्यात पेट्रोल तब्बल ८रुपयांनी तर डिझेल साडेआठ रुपयांनी महागले.
www.konkantoday.com