
डॉक्टरांमुळेच कोविडविरुद्धच्या लढय़ाचा गोवर्धन पेलणे शक्य झाले’ -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
तुमच्याशिवाय कोविडविरुध्दची लढाई अशक्यच होती. यापुढेही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे काैशल्य महाराष्ट्राला हवे आहे. डॉक्टरांमुळेच कोविडविरुद्धच्या लढय़ाचा गोवर्धन पेलणे शक्य झाले’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिना’निमित्त राज्यातील सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत.
१ जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त सर्व डॉक्टर्सना उद्देशून उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. ‘डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील योद्धय़ांमुळेच आपण आजपर्यंतचा कोविडचा लढा लढलो आणि पुढेदेखील हे आव्हान तुमच्याच भक्कम साथीने आपण पेलणार आहोत’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी या पत्रात व्यक्त केला.सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स असोत वा खासगी डॉक्टर्स, प्रत्येकाने जीवाची बाजी लावून रुग्णाला जीवदान देण्यासाठी आपले सर्व पणाला लावले आहे. महाराष्ट्र ही लढाई तुमच्याशिवाय लढू शकत नव्हता आणि लढू शकणार नाही.’ असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कोविड रुग्णांप्रमाणेच नॉन-कोविड रुग्णांवर उपचार, बाळंतपणे, मेडिकल इमर्जन्सी, बालकांचे आजार यावरही तुम्ही उपचार दिलेत ही बाबही काैतुकास्पद आहे असे त्यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com
