![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2020/10/images.jpeg-434.jpg)
राज्यात ७० टक्के लसीकरण झाले तर तिस-या लाटेची दाहकता कमी जाणवेल -आरोग्यमंत्री राजेश टोपे
फक्त लसीकरणामुळेच तिसरी लाट ठोपवता येईल. राज्यात ७० टक्के लसीकरण झाले तर तिस-या लाटेची दाहकता कमी जाणवेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्यमंत्री टोपे पुढे म्हणाले की, राज्यात जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाला नागरीकांच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
देशभरासह राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरी अजूनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. त्याचबरोबर रुग्णांचे मृत्यू देखील होत आहेत.
www.konkantoday.com