गणेशोत्सवासंदर्भात शासनाकडून नियमावली जाहीर
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवावर करोनाचं विघ्न कायम आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर ठाकरे सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, सार्वजनिक आणि घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.यंदा गणेशोत्सव जल्लोषात आणि नेहमीच्या थाटात साजरा होईल, अशी आशा होती. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेनं त्यावर पाणी फेरलं. करोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी धोका ओळखून राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली निर्धारित केली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणच्या गणेशमूर्तीसाठी ४ फूट, तर घरगुती गणेशमूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी घेतलेली असल्याने या नियमावलीवर काय प्रतिक्रिया उमटतात हे पुढील काही दिवसात दिसेल
www.konkantoday.com