
अभाविप रत्नागिरी शाखेकडून राणी लक्ष्मीबाई जयंती निमित्त 1111 फूट भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
स्वातंत्र्यकाळात अनेक क्रांतिकारक या देशासाठी शहिद झाले.या सगळ्यांच्या स्मरणासाठी आणि राणी लक्ष्मीबाई जयंतीचे औचित्य साधून विशाल तिरंगा पदयात्रेचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्यगाथेचा गौरवशाली इतिहास सगळ्यांसमोर यावा आणि युवकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती जागृत व्हावी यासाठी अभाविप रत्नागिरी मार्फत ही अभूतपूर्व तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 70 वर्षात संपूर्ण कोंकणात अशा प्रकारची न भूतो न भविष्यती अशा प्रकारची भव्य तिरंगा रॅली पहिल्यांदाच होणार आहे.3000 पेक्षा जास्त विध्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचाही यानिमित्ताने विशेष सत्कार होणार आहे.
ही रॅली दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालय-बस स्टँड- राम आळी-गोखले नाका-विठ्ठल मंदिर- काँग्रेस भवन – टिळक आळी- शेरे नाका- लक्ष्मी चौक मार्गाने मार्गक्रमण करेल. मोठया संख्येने रत्नागिरी शहरातील विद्यार्थी आणि सर्व देशप्रेमी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अभाविप कडून करण्यात येत आहेत.
www.konkantoday.com