
परप्रांतीयांनी परत रोजगारासाठी मुंबईची वाट धरली
कोरोना रूग्णांची संख्या ओसरू लागल्याचे तसेच कोरोनाविषयक निर्बंध हटू लागल्यामुळे परराज्यातून मुंबईकडे पुन्हा कामगारांचा ओघ सुरू झाला आहे. फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर हजारो परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतले होते. मात्र मे आणि जून या दोन महिन्यात मुंबई महानगरीत आलेल्या मेल, एक्स्प्रेसमधून २८ लाख प्रवासी दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक प्रवासी मध्य रेल्वेवरून दाखल झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
www.konkantoday.com