लस घेण्याआधी पेनकिलर्स खाताय? थांबा
करोना लसीचे साईड इफेक्ट होऊ नये म्हणून लस घेण्याआधी पेनकिलर्स खाऊ नये असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिल आहे. लस घेण्याआधीच पेनकिलर्स खाल्ल्यास त्याचा विपरित परिणाम लसीच्या प्रभावावर होऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी करोना प्रतिबंधक लस घेऊन झाल्यानंतर जाणवणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी पेनकिलर्स घेतल्यास हरकत नाही असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
www.konkantoday.com