
हाच का तो राष्ट्रीय महामार्ग? मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था
मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झाली आहे. महामार्गावरून प्रवास करताना रस्त्यांवर जागोजागी मोठमोठे खड्डे पाहायला मिळतायत. थोड्याच दिवसात गणेशोत्सव असल्याने कोकणात येणारा चाकरमानी याच रस्त्याने प्रवास करणार. कित्येक वर्षे चालू असलेल्या चौपदरीकरणाचं काम अद्यापही सुरुच आहे. काही ठिकाणी हे काम पूर्ण देखील झाले आहे. असं असलं तरी पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळत आहे. मोठ मोठे खड्डे, अर्धवट अवस्थेत असलेले पुलाचे काम यांमुळे या मार्गावरून वाहतूक करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
www.konkantoday.com