
समाजसेवक रूपेश गोरे यांच्या तर्फे धनगर समाज बांधवांच्या अत्यावश्यक रूग्ण सेवेसाठी विनामुल्य गाडीची सेवा
खेड तालुका,खोपी गावचे रहिवासी,समाज सेवेची आवड असणारे धनगर समाजाचे युवा नेतृत्व, प्रसिध्द ट्रॅव्हल्स व्यवसायक रूपेश बाळाजी गोरे यांनी धनगर समाज बांधवांच्या अडीअडचणींचा विचार करून फक्त अत्यावश्यक रूग्ण तालुक्यातील रूग्णालयांमध्ये घेऊन जाण्यासाठी विनामुल्य गाडी देण्याचे जाहीर केले आहे.
धनगर समाज हा डोंगर द-यांमध्ये राहाणारा व शासकीय सुविधांपासून वंचित असणारा समाज आहे.बहूतांश धनगर वाड्यांवर परिपुर्ण रस्त्याची सोय नसल्याने एखादा गंभिर आजारी रूग्ण दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी डोलीचा वापर आजच्या अधुनिक युगात करावा लागतो.धनगर समाजाच्या अडीअडचणीच्या काळात शक्यतो गावातील कोणीही मदत करण्यास पुढे येत नाही.अशा परीस्थितीत सामाजिक बांधिलकीच्या ओढीने समाजातील एक तरूण समाजाच्या मदतीला धाऊन येत आहे ही समाधानाची बाबआहे.समाजसेवक रूपेश गोरे यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.भविष्यात धनगर समाजातील युवा पिढी रूपेश गोरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करण्यास पुढे येतील अशी आशा रामचंद्र बाबू आखाडे जिल्हाध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधनमंच यांनी व्यक्त केली आहे समाजसेवक रूपेश गोरे यांनी अत्यावश्यक रूग्ण सेवेसाठी जाहीर केलेल्या विनामुल्य गाडीचा लाभ खेड तालुक्यासह जवळच्या मंडणगड,दापोली,चिपळूण तालुक्यातील काही गावांना होणार आहे.मोफत गाडी सेवेचा लाभ घेण्यासाठी
श्री रूपेश बाळाजी गोरे
संपर्क नं : 7620896042
9594843104
यांच्याकडे संपर्क करण्याचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com