“राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही”, आनंदराव अडसूळ म्‍हणाले.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वाट्टेल ते बोलण्‍याची सवय आहे. जे होणार आहे, तेच आम्‍ही बोलतो. अमरावती लोकसभा मतदार संघातून कुठल्‍याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असून एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्‍या शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे प्रसार माध्‍यमांशी बोलताना दिली. आनंदराव अडसूळ हे निवडणुकीला सामोरे जाणार नसून वडीलकीच्‍या नात्‍याने ते नवनीत राणा यांचा प्रचार करतील, असे वक्‍तव्‍य रवी राणा यांनी अलीकडेच केले होते. त्‍यावर आनंदराव अडसूळ यांनी आश्चर्य व्‍यक्‍त करीत राणांचा दावा खोडून काढला.अडसूळ म्‍हणाले, गेल्या ८ निवडणुकांपासून युतीत अमरावती लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडेच राहिला आहे. भाजप-सेनेची युती आजही कायम आहे. अमरावती लोकसभेची जागा भाजपची कधीच नव्हती, ती जागा आमचीच आहे. खरी शिवसेना-शिवसेनेचे नाव-पक्ष चिन्ह सर्व काही आमच्याकडेच आहे. त्यामुळे आम्ही आमचा दावा सोडणार नाही. एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही. किंबहुना तशी वेळच येणार नसल्याचा दावाही यावेळी आनंदराव अडसूळ यांनी केला. राणा दाम्‍पत्‍याला काहीही बोलण्‍याची सवय आहे. हे सर्व लोक जाणतात. त्‍यांच्‍या प्रत्‍येक वक्‍तव्‍यावर काय प्रतिक्रिया देणार, असा सवाल करीत कपड्याच्‍या आत सगळे नागडे असतात, असा टोला अडसूळ यांनी लगावला.नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आटोपला आहे आणि न्‍यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. लवकरच निर्णय अपेक्षित असून आमच्‍या बाजूने निकाल लागणार आहे. या आधी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्या १०८ पाणी निकालपत्रात राणांचे सर्व ७ दस्तावेज खोटे असल्‍याचे सिद्ध झाले. सर्वोच्‍च न्‍यायालयातही या बाबी समोर आल्‍या. काय खरे-काय खोटे हे न्यायालयापुढे सर्व पुराव्यानिशी मांडण्यात आले आहे, असे अडसूळ म्‍हणाले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button