लोटे गावचे हददीत राष्ट्रीय फाटयावर गोव्याकडुन पनवेलकडे विदेशी मद्य घेऊन जाणारा टेम्पो पकडला ११ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाय.एम. पवार विभागीय उपआयुक्त कोल्हापुर व ग जिल्हयाचे जिल्हा प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली दि. २५/०६/२०२१ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खेड व चिपळुण विभागाचे अधिकारी व कर्मचारी गोव्याकडुन येणा-या वाहनांची तपासणी करीत असताना मौजे खेड लोटे MIDC व राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ रोडवर अवैध मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन गस्ती मोहिम राबविण्यात आली असता प्रभारी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खेड विभाग व उप निरीक्षक खेड क्र.१ यांना गोपनीय बातमी मिळालेवरून मौजे लोटे गावचे हददीत राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील एक्सल फाटयावर गोव्याकडुन पनवेलकडे जाणा-या संशयित वाहनांची दारूबंदी कायद्याअंतर्गत सखोल तपासणी करत असताना महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप टेम्पो क्र. MH-08-AP-3473 या वाहनास तपासणीसाठी थांबविले असता सदर टेम्पोच्या मागील हौद्यामध्ये खाकी रंगाच्या पुठठयांच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीची ७५० मि.लि. च्या गोल्डन अॅश ब्ल्यु फाईन व्हिस्कि, गोल्ड अॅण्ड ब्लॅक XXX रम असे एकूण ९२ बॉक्समध्ये (८२८ ब.लि.) एवढा विदेशी मद्याची वाहतुक करीत असताना मिळुन आला. तसेच सदर आरोपीचे ताबे कब्जातुन सॅमसन गॅलक्सी कंपनीचा J6+ मॉडेलचा स्क्रीन टच मोबाईत जप्त करण्यात येवून वाहनासह एकुण मुद्येमालाची किंमत रु. ११,६२,०००/- एवढया किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येवुन सदर मुद्येमालाची वाहतुक करणारा वाहन चालक पांडुरंग दयानंद कदम, रा.मु.पो.वालोपे बैंडकरवाडी ता.चिपळुण जि. रत्नागिरी यास चौकशीसाठी ताब्यात घेवून त्याचे विरूध्द या कार्यालयाचा गुन्हा रजि. क्र.११८/२०२१ दि. २५/०६/२०२१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरची गोवा मद्य आयात करणारा मुख्य सुत्रधार कोण आहे? याबाबत कसून चौकशी करण्यात येत आहे.
सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव तसेच उप निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ, सहा.उप निरीक्षक आर. बी. भालेकर, जवान ए. के. बर्वे तसेच चिपळुण विभागाचे प्रभारी निरीक्षक .एस.एन.पाटिल, उप निरीक्षक एन.डी. पाटिल, जवान-नि-वाहन चालक श्री. ए. व्ही. वसावे, तसेच जवान एस. एन. वड व शेख यांनी भाग घेतला.
सदर गुन्हयांचा पुढील तपास प्रभारी निरीक्षक शंकर जाधव करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button