
राजिवडा समुद्रात बेकायदेशीर शेडचे बांधकाम,सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्ताची घटनास्थळी पाहणी बंदर विभागाची बांधकाम पाडून टाकण्याची नोटीस
राजिवडा समुद्रात बेकायदेशीर शेडचे बांधकाम करणार्या अब्बास वस्ता यांना बंदर विभागाने नोटीस देऊन बांधकाम हटवण्यास सांगितले. त्याचबरोबर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनीही हे बांधकाम करणार्यास मोबाईलवरून संपर्क साधून येत्या सोमवारपर्यंत बांधकाम पाडून टाकण्यास सांगितले.
मच्छिमार नौकांमधील मासळी उतरवण्यासाठी राजिवडा समुद्रात शासनाने जेटी बांधली आहे. या जेटीला लागूनच समुद्रात अनधिकृतपणे शेड बांधली जात असल्याची तक्रार राजिवड्यातील स्थानिक मच्छिमार नौका मालक आणि मच्छी व्यापार्यांनी केली हाेती जिल्हाधिकारी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त, बंदर विभाग, पतन विभाग, रत्नागिरी नगर परिषद आणि शहर पोलिस ठाण्यात या तक्रारी देण्यात आल्या.
समुद्र क्षेत्र बंदर विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे या विभागाने वस्ता यांना नोटीस देऊन समुद्रातील बांधकाम तोडण्यास सांगितले. त्याचबरोबर समुद्रातील जेटी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने रविवारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक मच्छिमार युसुफ मुल्ला, माजी नगरसेवक बिजली खान, फकीर वस्ता, ताहीर मुल्ला, शाबीर पावसकर, हनिफ फणसोपकर आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com