
हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर करण्यासाठी ३० जानेवारी रोजी दरवर्षी देशभर दोन मिनिटे मौन
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर करण्यासाठी ३० जानेवारी रोजी दरवर्षी देशभर दोन मिनिटे मौन अर्थात स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य शासनाकडून परिपत्रकाद्वारे जारी करण्यात आले आहे. त्यानुसार या वर्षीही ३० जानेवारी सकाळी ११ वा. २ मिनिटे मौन पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येेणार आहे. मौन पाळण्याआधी अर्थात सुरूवातीला सकाळी १०.५९ वा. पासून ११ वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजवण्यात येईल. हा इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालय, आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, यामधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळायचे आहे. सकाळी ११.२ मिनिटांनी मौन संपल्यासंबंधीचा इशारा भोंगा सकाळी ११.०३ मिनिटांपर्यंत वाजविण्यात येणार आहे. www.konkantoday.com