
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकारला १५ ऑगस्टची मुदत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. ‘नवी मुंबई भूमिपुत्रांना खरा न्याय मिळवून देण्याचे काम दि.बा पाटील यांनी केले. सिडकोने विमानतळाला दिबांच्याऐवजी दुसरे नाव देण्याचा ठराव आणला तो हटवावा व दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याचा ठराव मंजूर करावा,’ अशी मागणी करत १५ ऑगस्टपर्यंत ही कार्यवाही न झाल्यास १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी जाहीर सभेतून दिला.
www.konkantoday.com