जिल्हाधिकारी हटाव रत्नागिरी बचाव मोहिमेत आता समविचारी मंचची मुख्यमंत्र्यांकडे धावः लोकायुक्तांकडेही तक्रार
रत्नागिरीः रत्नागिरीतील वकील अँड,सूरज मोरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना कर्तव्य कसूर केल्या प्रकरणी नोटीस दिल्यानंतर त्या पाठोपाठ आता सर्वसामान्य जनतेच्या भावना विचारात घेऊन ‘जिल्हाधिकारी हटाव रत्नागिरी बचाव’ मोहिम महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने सुरु करण्यात येत असून तशा आशयाची निवेदने मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या एकूण कार्यपद्धती बद्दल जनतेच्या मनात कुरबुर सुरु आहे.विशेषतः कोरोना विषयक प्रशासकीय आरोग्य यंत्रणा राबविण्यात आणि लॉकडाऊन विषयात घेतलेल्या निर्णयातील अदलाबदल त्यायोगे सामान्य माणसे विशेषतः व्यापारी वर्गात कमालीचा असंतोष पसरला आहे.नेमका हाच धागा पकडून समविचारी मंचने आज कायदेशीर तज्ञांची मते घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीसह त्यांनी कोरोना या महामारीत घेतलेले निर्णय व अन्य प्रशासकीय बाबी तपासून त्यांची बदली करावी.आणि त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची चौकशी अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह लोकायुक्तांकडे करण्याचे ठरविण्यात आले असल्याचे समविचारीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
निर्णय प्रक्रियेच्या अदलाबदलासह इतर सर्व विषय घेण्यात येणार असून सर्वप्रथम बदली नंतर या विषयांबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समविचारीच्या वतीने केली जाईल असे सांगितले.
समविचारीच्या सर्वानुमते घेतलेल्या निर्णयात सर्वस्वी केशव भट,बाबा ढोल्ये,संजय पुनसकर,निलेश आखाडे,रघुनंदन भडेकर,राजाराम गावडे,मंदार लेले,रिकी नाईक,विश्वजित कोतवडेकर,सागर खेडेकर,सचिन रायकर,अनिकेत खैर,नवनीत लांजेकर,तन्मय पटवर्धन,प्रविण नागवेकर, नागवेकर,अनिल नागवेकर,अमोल सावंत आदींनी सहभाग घेतला.
www.konkantoday.com