किल्ले पर्यटन योजना बाबत लोकांनी सूचना व हरकती पाठवाव्यात -पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर

0
34

गड किल्ल्यांचे जतन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच गिरिप्रेमींच्या घेतलेल्या बैठकीनंतर अवर्गीकृत किल्ल्यांकडे पर्यटकांनी आकृष्ट व्हावे, त्यांना तेथे पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी किल्ले पर्यटन योजना आखण्यात आली आहे. या योजनेबाबत लोकांनी सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.
योजनेचा मसुदा पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासंदर्भातील सूचना व हरकती [email protected] या ईमेलवर ८ जुलै २०२१ पर्यंत पाठविण्यात याव्यात,असे कळवण्यात आले आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here