
कोकणात महावितरणाचे थकबाकीदार वाढले
महाराष्ट्रात अनेक जिल्हे पूर्वीपासून महावितरणाच्या थकबाकीदारांच्या यादीत होते आता त्यात कोकण चाही समावेश होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ग्राहकांकडे महावितरणची थकबाकी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १०लाख९हजार५५३ग्राहकांकडे २५कोटी ५४लाख ८४हजार थकबाकी आहे. यामध्ये पंधरा हजार सहाशे तेरा घरगुती ग्राहकांकडे अठरा कोटी आठ लाख चोपन्न हजार रुपये थकलेले आहेत.आता थकबाकीमुळे महावितरण अडचणीत असल्याने थकबाकीदारांच्या वीजपुरवठा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कृषी पंपाचे ९८लाख रुपये थकलेले आहेत. एकीकडे ग्राहकांकडे कारवाई करत असताना जे अधिकारी कमी वसुली करतील त्यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com