
अजगराला मारून त्याला अर्धवट जाळल्या प्रकरणी नाटे पडवणेकरवाडी येथील तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले
कोंबडीला खाणाऱ्या अजगराला मारून त्याला अर्धवट जाळल्याप्रकरणी नाटे पडवणेकरवाडी येथील तिघांना वनविभागाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. यातील आरोपी विजय पारकर (५३ वर्षे), वंदना पारकर (४४ वर्षे) आणि मानसी पारकर (२७ वर्षे) यांनी अजगराला जाळताना व्हिडीओ केला. तसेच अर्धवट जाळलेल्या या अजगराला व कोंबडीला गावातील ओढ्याजवळ नेऊन टाकले.
www.konkantoday.com