महामार्गावर सोनगिरी येथे दरड कोसळली एकेरी वाहतुक सुरु, वाहनांच्या रांगा

0
45

*संगमेश्वर परिसरात गुरुवारी सायंकाळी कोसळणाऱ्या पावसाने महामार्गावरील कोळंबे- सोनगिरी दरम्यान दरड कोसळल्याने रस्यावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती.
आठ दिवसापूर्वी याच ठिकाणी मोरी खचल्याची घटना घडली होती. त्याचे काम चालू असतानाच बाजूला दरड कोसळल्याने रस्त्यावर माती, दगड आले होते. मात्र माती रस्त्यावर आल्याने दुचाकी घसरण्याचे प्रकार घडत होते. जेसीबीच्या सहाय्याने सायंकाळी उशिरापर्यंत दरड उचलण्याचे काम सुरु होते.
निढळेवाडी येथे दरड कोसळल्याने एका घराला धोका निर्माण झाला आहे. तर तळेकांटे येथे मोठ्या दगडी खाली आल्या आहेत. परंतु त्या एकमेकांमध्ये अडकल्याने आणखी माती खाली आल्यास हेच दगड रस्त्यावर येऊन अपघात होऊ शकतो याबाबत खात्याने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा असे प्रकार वारंवार हाेऊ शकतात .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here