एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीमधून मिळालेल्या उत्पन्नातून कर्मचार्यांचा पगार देण्यास सुरुवात केली
राज्य सरकारने दिलेला ३०० कोटी रुपयांचा पहिला हफ्ता बुधवार संध्याकाळपर्यंत एसटीच्या खात्यात जमा न झाल्याने महामंडळाने गेल्या दोन आठवड्यात प्रवासी वाहतुकीमधून मिळालेल्या उत्पन्नातून कर्मचार्यांचा पगार देण्यास सुरुवात केली. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
कर्मचार्यांचे मे महिन्याचे थकलेले वेतन देण्यासाठी राज्य सरकारने ३०० कोटी रुपये महामंडळास देण्याबाबत मंगळवारी अध्यादेश काढला. परंतु बुधवार संध्याकाळपर्यंत हा निधी महामंडळाच्या तिजोरीत जमा झाला नाही. कर्मचार्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होतो,परंतु तो अद्याप झाला नाही
www.konkantoday.com