
आता वर्ग दोनच्या जमिनीही तारण ठेवता येणार, महसूलमंत्र्यांचा निर्णय.
शेतकर्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकर्यांना कर्जपुरवठा करतात. मात्र, भोगवटा वर्ग-२ जमिनीवर बोजा आकारता येत नसल्याने शेतकर्यांना कर्जापासून वंचित रहावे लागते. अशा शेतकर्यांना कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी महसूल विभागाने निर्णय घेतल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
भोगवटा वर्ग-२ च्या जमिनीवर बँकांना कर्जाचा बोजा आकारण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले यांनी केली होती. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून आता बँकांना वर्ग-२ च्या जमिनीवर कर्ज उपलब्ध करुन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देवस्थान इनाम जमिनीबाबत कमिटी नेमण्यात आली असून त्या बाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.www.konkantoday.com