
मासे गरविण्यासाठी समुद्रात गेलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले
गुहागर तालुक्यातील आरे गावचे दोन युवक गुहागर-आरे येथील खडपात मासे गरविण्यासाठी गेले असता दुसरा दिवस उजाडला तरी ते परत न आल्याने शोध घेतला असता मंगळवारी या दोघांचेही मृतदेह हाती आले आहेत. या दोन्ही युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.आरेगावमधील सोमवारी २१ जूनला सायंकाळी मासे गरवायला गेलेल्या दोन तरुणाचे मृतदेह सापडले आहेत. गुहागर तालुक्यातील बागेतील पाचमाड परिसरातमासेमारीसाठी हे समुद्रावर गेले होते. हे तरुण परत आले नाहीत. त्यामुळे दोघेही समुद्रात बेपत्ता झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती.ग्रामस्थ आणि पोलीस या दोन तरुणांचा शोध घेत होते. सिद्धांत संदेश साटले (वय २३) रहाणार आरे कलमवाडी आणि प्रतीक किसन नावले (वय २५) रहाणार आरे नागदेवाडी अशी या दोन तरुणांची नावे असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
www.konkantoday.com