टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रिम प्रोजेक्टला आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या.
www.konkantoday.com