कुणासोबत कुणी जायचं हे त्यांनाच ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी -माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. सरनाईकांच्या पत्रावर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरनाईक यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला आहे. यावेळी फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरही टीका केली. प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच भाजपसोबत युती करावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. पण शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘भाजप स्वबळावरच लढत आहे.कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावे. कुणासोबत कुणी जायचं हे त्यांनाच ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू.’ आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडत आहोत. आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो. पण आमच्याकडे बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
www.konkantoday.com