
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गामुळे कोकणच्या विकासाची दारे खुली होतील : ऍड. विलास पाटणे
रत्नागिरी : वैभववाडी ते कोल्हापूर या मार्गाला नुकतीच केंद्राने मंजुरी दिली असून या नव्या रेल्वे मार्गामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाणार आहे. यामुळे व्यापार, उद्योग, पर्यटन आदी क्षेत्रात कोकणच्या विकासाची दारे खुली होतील, असे मत पर्यटक अभ्यासक ऍड. विलास पाटणे यांनी व्यक्त केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रकारचा ८०० ते १००० टन माल कोकणात येतो. तसेच कोकणातूनही आंबे, मासे आदी माल बाहेर जात असतो. आता हा मार्ग झाल्यास त्याची वाहतूक करणे सोयीचे होणार आहे. हा मार्ग झाल्याने कोकणच्या पर्यटनालाही मोठी उभारी मिळणार असून कर्नाटक व आंध्र ही राज्ये जवळ आल्याने नव्या संधी उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com