
शिवप्रसाद काय असतो ते संजय राऊत यांनी आ. वैभव नाईक यांना विचारावे -आ. नितेश राणे
कुडाळात शनिवारी सेना – भाजप कार्यकर्त्यांत झालेल्या राड्यावरून आ. नितेश राणे यांनी शिवसेना खा. संजय राऊत यांना डिवचले आहे. शिवप्रसाद काय असतो ते संजय राऊत यांनी आ. वैभव नाईक यांना विचारावे. आमच्या कार्यकर्त्यांनी आज पोटभर दिला. पाहिजे असल्यास पार्सल घेऊन सामना ऑफिसमध्ये येतो, चव नक्की आवडेल, असे म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी खा. संजय राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिल्याची प्रतिक्रिया दिली होती
www.konkantoday.com