
मनोज जरांगे यांनी वाशीमध्ये मोर्चा रोखला, पण सरकारला दिला मोठा इशारा, नाही दिलं तर उद्या आझाद मैदानात जाणार
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी एक दिवसाचा वेळ दिला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबतचा नवा जीआर दिला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सविस्तर भूमिका मांडली.यावेळी त्यांनी सगेसोयरेच्या मुद्द्यावरुन सरकारला आज एक दिवसाचा वेळ दिला. सरकारने आज रात्रीपर्यंच सगेसोयरीच्या मागणीचा जीआर तयार करावा, आम्हाला आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत जीआर तयार करुन द्या. अन्यथा उद्या आमचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेला निघेल, असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. विशेष म्हणजे आरक्षण मिळालं किंवा नाही मिळालं तरी आझाद मैदानावर जाणार, असं मनोज जरांगे ठामपणे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी यावेळी सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगेचा मेसेज वाचला.
“सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येसह आपण अध्यादेश काढणार आहोत. त्यावर सर्व सचिवांनी सह्या केल्या. असं सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सही केलीय.
मग एवढं झालंय तर मग अध्यादेश का काढला नाही. काही करा. रात्रीतून अध्यादेश काढा. हवं तर आजची रात्री इथेच काढतो.
आम्ही २६ जानेवारीचा सन्मान करतो. आम्ही मुंबईत जात नाही. इथेच थांबतो. प्रशासनाचा सन्मान करतो.
तुम्ही एवढं केलंय तर अध्यादेश द्या. जे जे निर्णय घेतले. आदेशकाढले तेवढे द्या. मी वकिलांशी चर्चा करून शब्दा शब्दावर किस पाडतो. अभ्यास करतो रात्रभर. तुम्ही आज रात्री नाही दिलं तर उद्या आझाद मैदानात जाणार आहोत. आम्ही एक पाऊल मागे येऊ, पण उपोषण सोडणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला
www.konkantoday.com