स्वामी स्वरूपानंदच्या रौप्य महोत्सवी ठेव वृद्धी मासाचा शुभारंभ

स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ठेव वृद्धी मास प्रतिवर्षी २० जून ते २० जुलै असा साजरा होतो. या वर्षीचा ठेववृद्धी मास हा २५ वा ठेव वृद्धी मास असून गेली सलग २५ वर्षे ठेव वृद्धी मासाच्या माध्यमातून ठेवीदारांशी संपर्क करत पतसंस्थेने ठेव संकलन केले आहे. २५ वर्षांपूर्वी प्रधान कार्यालय हेच अस्तित्वात होते. तालुका कार्यक्षेत्र होते. आज १७ शाखा आणि महाराष्ट्र कार्यक्षेत्र झालेली ही स्वरूपानंद पतसंस्था ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. ‘सातत्यपूर्ण शिस्तबद्ध आर्थिक व्यवहार’ ग्राहक सेवेच हे व्रत मानून गेली ३० वर्षे पतसंस्था मार्गक्रमण करत आहे. उत्तम आर्थिक स्थिती राखत, सातत्यपूर्ण निव्वळ नफ्यात राहत, वसुलीचा विक्रम अबाधित ठेवत पतसंस्थेचे मार्गक्रमण सुरू आहे. आज ७०७०२ एवढी ठेव खाती पतसंस्थेकडे आहेत. मोठ्या प्रमाणावर ग्राहक ठेवीदार सभासदांचा प्रतिसाद सातत्याने प्राप्त करत ठेव वृद्धीबरोबर ठेवीदार सभासद संस्थेतही पतसंस्थेने प्रचंड वाढ केली आहे.
ठेववृद्धी मासात स्वरुपांजली ठेव (१२ ते १८ महिने) सर्वसाधारण व्याजदर ७.३५%, ज्येष्ठ नागरिक/महिलांसाठी व्याजदर ७.६०% व सोहम ठेव योजना (१९ ते ६० महिने-मासिक व्याज) सर्वसाधारण व्याजदर ७.५०%, ज्येष्ठ नागरिक/महिलांसाठी व्याजदर ७.७५% अशा आकर्षक योजना संस्थेने जाहीर केल्या आहेत. या योजनांमध्ये आपली ठेव गुंतवणूक ठेवीदारांनी आकर्षक व्याज दराने लाभार्थी व्हावे असे आव्हान ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
स्वरूपानंद संस्थेकडे आज २२७ कोटींच्या ठेवी असून ९९% एवढी वसुली असून गेली २९ वर्ष लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग असून संस्थेच्या गुंतवणुका १०१ कोटी असून स्वनिधी २७ कोटी एवढा लक्षणीय आहे. आर्थिक सुदृढता राखत संस्थेने अर्थकारण केले आहे. गेल्या ५ वर्षातल्या ठेव वृद्धी मासाचा ठेव संकलनाचा आढावा खूप रोचक आहे. ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास प्रतीत करणारी ही आकडेवारी नमूद करताना खूप समाधान होते. सन २०१६ साली ५ कोटी १० लाखाच्या ठेवी ठेव वृद्धी मासात जमा झाल्या. सन २०१७ मध्ये ६ कोटी १३ लाख ठेव संकलित झाली. सन २०१८ च्या ठेव वृद्धी मासात ७ कोटी १८ लाखांच्या ठेवी संकलित झाल्या. सन २०१९ मध्ये ११ कोटी ४३ लाखांचे ठेव संकलन झाले. तर कोरोनाग्रस्त सन २०२० च्या ठेव वृद्धी मासात ९ कोटी २१ लाखांचे ठेव संकलन झाले. २५ व्या रौप्य महोत्सवी ठेव वृद्धी मासात १० कोटींचा इष्टांक पूर्ण करण्यासाठी नव्या-जुन्या सर्व ठेवीदारांनी या ठेव वृद्धी मासाला भरभरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button