
कोकणात आज फाकपंचमीने शिमगोत्सवाची सर्वत्र धूमधाम मानकरी मंडळी, गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृतीची अनुभूती देणार्या शिमगोत्सवाची धुमधाम
रत्नागिरी जिल्हाभरात आजपासून सुरू होणार आहे. आज १४ मार्च रोजी पहिल्या होळीचे सर्वत्र आगमन होणार आहे. अशा या शिमगोत्सवाला आज फाकपंचमीने प्रारंभ होणार आहे.कोकण व शिमगा ही गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. येथील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी सणासाठी त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. कोकणात विशेषतः जिल्ह्यात शिमगगा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. अशा या शिमगोत्सवाला सोमवारी फाकपंचमीने प्रारंभ होणार आहे. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. त्यानंतर होळीपौर्णिमेला शिमग्याची सांगता होणार आहे. www.konkantoday.com