रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पोलीस विभागाकडून ‘ई-ज्योती’ या नावाने ई-लर्निंग सुविधा सुरू
आज पोलीस विभागावर अनेक महत्त्वपूर्ण व मोठय़ा जबाबदाऱ्या आहेत पोलिसांकडून ही कर्तव्य पार पाडत असताना कुठलाही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कोणतीही त्रुटी राहू नये यादृष्टीने त्यांना पूर्णत: प्रशिक्षित करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून व पोलीस विभागाकडून ‘ई-ज्योती” या नावाने ई-लर्निंग सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे या माध्यमातून सर्व पोलिसांना घरबसल्या किंवा ड्युटी करताना याचा फायदा होणार आहे.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना अतिशय खबरदारीने वागावे लागते. यासाठी काही कौशल्य आत्मसात करावी लागतात. अनवधानाने क्षुल्लक चूक झाली तरीही तपासात अनेक अडचणी येतात व गुन्हेगाराचा शोध घेताना अडचण होऊ शकते. त्यामुळे पोलिसांकडून तपासदरम्यान कुठलीही चूक न होता कशा पद्धतीने एखादे प्रकरण हाताळावे यासाठी ‘ई-ज्योती’ याद्वारे मिळणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा फायदा पोलिसांना मिळणार आहे.
www.konkantoday.com