खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त ‘संकल्प दिन’ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड विजयराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवशी निमित्त ‘संकल्प दिन’ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय समोर घोषणा देण्यात आल्या. मा.खा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय समोर घोषणा द्याव्यात अश्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार राहुलजी को लाना है देश को बचाना है, राहुल जी को लाना है महंगाई घटानी है,राहुल जी को लाना है बेरोजगारी हटानी है,राहुल जी को लाना है यूवाओ को रोजगार देना है,राहुल जी को लाना है संविधान बचाना है अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत,प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे,मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,जिल्हा सरचिटणीस दिपक राऊत, जील्हा चिटणीस शब्बीर भाटकर,महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख, विधानसभा क्षेत्रअध्यक्ष सचिन मालवणकर सोरभ भोंगले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com