सावर्डे येथून अकरा वर्षांपूर्वी अपघात करून फरारी झालेल्या आरोपीला पोलिसांनी केली अटक
सावर्डे येथे ११वर्षांपूर्वीअपघात करून फरार झालेल्या संशयित आरोपी नजमुद्दीन सोराब खान याच्या
फरारी शोध पथकाने सोमवारी धुळे येथून मुसक्या आवळल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या फरारी शोध पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.
नजमुद्दीन सोराब खान (४८,रा. शिवडी, मुंबई ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे सदरचा संशयित मुंबई गोवा महामार्गाने जात असताना .९ डिसेंबर २०१० रोजी सावर्डे येथील गिजगीजमा मशिदीसमोर रस्ता ओलांडऱ्या भिकाजी बागवे या पादचाऱ्याला त्याने आपल्या ताब्यातील तवेरा गाडीने धडक देत अपघात केला होता. आघातानंतर तो फरार झाला होता.दरम्यान पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात मोटार ऍक्ट 184 नुसार त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
www.konkamtoday.com