मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आल्याने जम्बो कोविड सेंटर ओस पडू लागली
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आल्याने जम्बो कोविड सेंटर ओस पडू लागली आहेत. सहापैकी वरळी ‘एनएससीआय’ डोम आणि गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण असून दहिसर, बीकेसी, मुलुंड जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. तर भायखळ्याचे रिचर्डसन क्रुडास सेंटरमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. फक्त अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात ५० टक्के कोरोना रुग्ण असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
www.konkantoday.com