राज्याच्या ग्रामीण गृहराज्यमंत्र्यांवरच तरूणांकडून पाळत,सातारा पोलिसांकडून तपास सुरू
राज्याचे ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे काल (ता.१४) सायंकाळी घरातून बाहेर पडून शहरात पायी फेरफटका (ईव्हनिंग वॉक) मारत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी त्यांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. संबंधितांना अंगरक्षकांनी हटकल्यानंतर त्यांनी पळ काढला. मात्र पुन्हा तेच युवक तेथे आले आणि पुन्हा दुचाकीवरुन वेगात निघून गेले.
या सर्व घटनेनंतर सातारा पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला असून मंत्री सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण सातारा पोलिसांनी दिले आहे. दरम्यान, मंत्री देसाई यांच्या बंगल्याबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
www.konkantoday.com