
खडपेवठार येथील घरातून चार्जिंगला लावलेला मोबाईल अज्ञाताने लांवबला
_रत्नागिरी शहरातील खडपेवठार येथील घरातून चार्जिंगला लावलेला मोबाईल अज्ञाताने लांवबला. ही घटना शनिवार 23 मार्च रोजी दुपारी 1.30 ते 1.40 वा. कालावधीत घडली आहे.याबाबत निर्मला बाळू गोसावी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्या खडपेवठार येथे जगदीश खडपे यांच्याकडे भाड्याने रहातात. शनिवारी दुपारी त्यांनी आपला सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचा 4 हजार 800 रुपयांचा मोबाईल घरामध्ये चार्जिंगला लावला होता. काही वेळाने त्या मोबाईलचे चार्जिंग बंद करण्यासाठी गेल्या असता त्यांना आपला मोबाईल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com