रत्नागिरी जिल्हा तिसर्या टप्प्यात येत नाही किंवा निकषात बदल होत नाही तोपर्यंत इतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळणे अशक्य
राज्य शासनाने निर्बंध शिथिल करताना ठरवून दिल्याप्रमाणे पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेच्या आधारे पाच टप्पे ठरवून देण्यात आले आहेत त्याप्रमाणे निर्बंधांत सूट देण्याचे जाहीर करण्यात आले आहे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा अद्यापही चौथ्या टप्प्यात आहे त्यामुळे या जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी मिळालेली नाही त्यामुळे या व्यापारीवर्गाच्या मोठी नाराजी आहे गेले दोन महिने दुकाने बंद असल्याने व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत शासनाने जीअत्यावश्यक सेवेत खाली दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे त्याला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली अाहे त्यामुळे या निकषात न बसणार्या दुकानदारांनी दुकाने उघडल्यावर अशा दुकानांवर अनेकवेळा पोलिसांकडुन कारवाई केली जात आहे त्यामुळे या व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे वास्तविक जिल्हा प्रशासन , लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांची जी मीटिंग झाली त्यामध्ये चौथ्या टप्प्यात कुणाला परवानगी मिळणार हे स्पष्ट झाले होते हे निर्बंध शिथिल करताना या वेळी शासनाने अत्यावश्यक सेवेची व्यापकता वाढवल्याने अनेक व्यावसायिकांना त्याचा फायदा होऊन आपली दुकाने उघडता आली मात्र त्या निकषामध्ये न बसणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे स्थानिक प्रशासनाच्या विराेधात किंवा आंदोलनाचा पवित्रा घेतला तरी त्यातून काही वेगळे निष्पन्न होण्याची शक्यता कमी आहे कारण स्थानिक पातळीवर नियमात बदल करणे प्रशासनाच्या हातात नाही जोपर्यंत शासनाकडून ठरवून दिलेल्या निकषात बदल होत नाही किंवा रत्नागिरी जिल्हा शासनाने घालून दिलेल्या अटीनुसार तिसर्या टप्प्यात येत नाही तोपर्यंत अन्य दुकानदारांना दिलासा मिळणे शक्य नाही दर गुरुवारी रात्रीपर्यंत आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला जातो व त्या त्या जिल्ह्याचा टप्पा ठरवला जातो सुदैवाने रत्नागिरी जिह्याचा पॉझिटिव्हिटी रेट या वेळी कमी आला व अन्य अटीत आपण बसवू शकलो तर गुरुवारनंतर रत्नागिरी जिह्यातील निर्बंध आणखी शिथिल होऊन सर्वांना दिलासा मिळणे शक्य आहे
www.konkantoday.com