
मिरजोळ्यात संरक्षण भिंत कोसळलीग्रामस्थानी मिरजोळे बौद्धवाडी रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करावा मिरजोळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन
मिरजोळे येथील करंदीकर वाडी ते कालिका मंदिर रस्त्याशेजारील संरक्षण भिंत मुसळधार पावसामध्ये कोसळली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच जमीन खचून 20 फूट खोल वाहून गेली आहे. येथील रस्ता वाहतुकीला धोकादायक झाला असून ग्रामस्थानी मिरजोळे बौद्धवाडी रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करावा असे आवाहन मिरजोळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com