कंत्राटदार व महावितरण अधिकाऱ्यांच्या चुका भोगत आहेत शिरगाववासीय,डांबरी रस्त्यावर आली परत एकदा माती
शासनाने शिरगाव परिसरात भूमिगत विद्युत वाहिनी आणण्याची योजना मंजूर केली असून त्याचे काम गेले काही महिने सुरू होते शिरगाव येथील हे काम लीना पॉवर टेक कंपनीला मिळाले होते विद्युत वाहिनी घालण्यासाठी कंपनीने चर खोदले होते कंपनीने आदिष्टी देवी मंदिरापर्यंत चुकीच्या बाजूने लाईन खोदत वर नेली त्यामुळे आता केलेल्या खोदाईमुळे संपूर्ण माती खाली येत आहे ही गोष्ट ग्रामस्थांनी त्या वेळीच लक्षात आणून दिली हाेती व याठिकाणी काँक्रीटच्या गटाराची आवश्यकता असल्याचे सांगितले परंतु कंत्राटदार व महावितरणने ही मागणी मान्य न करता चिरा बांधकामाचे गटाराचे काम सुरू केले हे कामसुद्धा अर्धवट करण्यात आले तसेच कामाचाही दर्जा नसल्याने मुसळधार पावसामुळे ही सर्व माती खाली आली आहे वास्तविक कोकणातील सर्व परिस्थितीचा विचार करून महावितरणने टेंडर काढताना देखील काँक्रीटच्या गटाराची गरज लक्षात घेणे आवश्यक होते परंतु कागदपत्रे सजवून टेंडर काढून कामे करीत असल्याने त्याचा फटका शिरगाववासियांना सध्या भोगावा लागत आहे मागील वादळाच्या वेळीदेखील हीच परिस्थिती झाली होती आतादेखील मोठय़ा प्रमाणावर डांबरी रस्त्यावर माती आली आहे
www.konkantoday.com