
रत्नागिरी शहरवासीयांसाठी चांगली बातमी ,रत्नागिरी नगर परिषद शहरवासीयांना लवकरच पुरविणार शुद्ध पाणी
मधून मधून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नाराज असलेल्या रत्नागिरी करांसाठी आता चांगली बातमी पुढे येत आहे रत्नागिरी नगर परिषदेने आता रत्नागिरी शहरवासीयांसाठी शुद्ध पाणी पुरवण्याचे निश्चित केले आहे
उन्हाळ्यात नव्हे, तर पावसाळ्यातही स्वच्छ पाणी शहरवासीयांना देण्याचा मानस पालिकेतील शिवसेनेचे सत्ताधारी आणि प्रशासनाचा आहे. त्यासाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च करून २०ते २५ वर्षानंतर प्रथमच साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राची दुरूस्ती सुरू आहे. १०० टक्के शुद्ध पाणी पंधरा दिवसात रत्नागिरीकरांना मिळणार आहे.पाणी तपासण्याची लॅबही उभारली जाणार आहे.एरिएशन फाउंटन दुरूस्ती, वॉटर चॅनल, फ्लॅश मिक्सर, फिल्टर बेल्ट, बॅकवॉश युनिट, व्हॉल्व्ह, क्लोरिन युनिट अशी यांत्रिक व विद्युत दुरूस्ती करून पालिकेचे अत्याधुनिक फिल्टरहाऊस बनणार आहे. शहरातील साळवी स्टॉप येथे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे.दिवसाला सुमारे १५ एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता केंद्राची आहे. मात्र गेल्या २५ वर्षांमध्ये त्याची दुरूस्ती झाली नव्हती. त्यामुळे जलशुद्धीकरणाचा दर्जा घसरला होता. ते शहरवासीयांच्या आरोग्यावर बेतण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर नगराध्यक्ष साळवी यांच्यासह सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आदींनी या कामी पुढाकार घेतला आहे
www.konkantoday.com