
आम्हाला भिक नको,पणआमचा व्यवसाय सूरू करण्याची परवानगी मिळावी, रत्ना.जि.फोटो.व्हिडिओ व्यवसाईक संघाची प्रशासनाकडे मागणी
गेल्या दोन महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील फोटो व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.वास्तविक फोटो स्टुडिओ हा अत्यावश्यक मधे मोडतोय.कारण आजकाल शासकीय कामात फोटो लागतोच.शेतकरीकर्ज,पॅनकार्ड,आधारकार्ड,जिकडे तिकडे लागतोच तरी पण आम्ही कोव्हिडवर मात करणेसाठी शासनाचे नियम म्हणुन बंद ठेऊन आहोत.त्यात आमचा लग्नकार्यांचे तीन मोठे सिझन दिवस पूर्ण वाया गेले.शासन जेव्हा नियमावली करते त्यामध्ये काय ऊघडणार काय बंद रहाणार मधे फोटोस्टुडिओ व्यवसाईकांच नावच घेत नाही त्यामुळे फोटो व्यावसायिकांना .बेदखचकेले जात आहे मग आम्ही जिल्ह्यातील फोटोस्टुडिओ व्यवसाईकांनी करायचे तरी काय की आम्ही आमचे व्यवसाय बंद ठेऊन कूटुंबांचे होणारे हाल डोळ्यांनी बघत रहायचे काय?की आत्महत्या करायच्या.बंद करायच तेवढा नियम समजतो.पण काय ऊघडणार काय बंद रहाणार त्यात मात्र फोटोस्टुडिआचा उल्लेखच केला जात नाही आत्तापर्यंत शासनाच्या व्यवसायाच्या यादीत कधीच आमची दखल घेतलीच नाहि.तरी आमच्या रत्ना.जि.फोटो.व्हिडिओ व्यवसाईक संघा तर्फे आमच्या व्यवसाय आत्यावश्यक सेवे मधे ऊघडण्याची मूभा मिळावी विषय आमची प्रशासनाकडे मागणी आहे .आम्ही जिल्हा स्टूडिओ व्यवसाईक शासनाचे नियम अटी पालन करून सोशल डीस्टंगसिंगचे आणि सॅनिटिईझेशन करुन ठराविक तास सेवा करू ईच्छीतो.तरी आमच्या परीस्थितिचा शासन दरबारी विचार व्हावा.
आम्हाला आमचा व्यवसाय करण्यास मूभा द्यावी.आम्ही कलाकार आहोत आम्हाला कोणाची भिक नकोय.आमचा व्यवसाय करून आम्ही आमच्या परीवाराचे पालनपोषण करण्यास सिध्द आहोत.तरी शासनाला कळकळीची विनंती आहे अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे
www.konkantoday.com