
घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा पुलावर भरधाव टँकर लोखंडी ग्रीलचा कठडा तोडत थेट खाडीत कोसळला
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा पुलावर आज दुपारी सुमारे 11.30 च्या सुमारास एक भीषण अपघात घडला.भरधाव टँकर लोखंडी ग्रीलचा कठडा तोडत थेट खाडीत कोसळला. या भीषण अपघातात टँकरचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संपूर्ण टँकर पाण्यात बुडाला आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर टँकर वसईहून ठाण्याकडे निघाला होता. दरम्यान, गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर टँकरने पुढे चाललेल्या लाकडांनी भरलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, चालक गोंधळून गेला आणि त्याने गाडीचं स्टेअरिंग वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटल्याने टँकर पुलाच्या कठड्याला धडकून खाली खाडीत कोसळला.