रत्नागिरी जिल्ह्यात कोविड लसीकरण खासगी संस्थांमध्येही सुरु होणार

रत्नागिरी जिल्ह्यातील १० खासगी वैद्यकीय संस्थांना कोविड लसीकरण केंद्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
खासगी हॉस्पिटलना कोविड लसीकरणाची परवानगी देताना काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ज्या जागेत लसीकरण करणार आहे त्या जागेत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरिक्षण कक्ष अशा ३ खोल्या असाव्यात. निरीक्षण कक्षाला प्रवेद्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग स्वतंत्र असणे आवश्यक आहे. तसेच प्रतिक्षा कक्षामध्ये हात धुण्याची व्यवस्था व सॅनिटायझरची सोय असावी.
लसीकरण कक्षामध्ये लसीकरणाशी संबंधित आवश्यक असणाऱ्या शीतसाखळी, हबकटर, अत्यावश्यक औषधांची व्यवस्था, लसीकरण संदर्भातील आरोग्य शिक्षण साहित्य, लसीकरण करताना डॉक्टरची उपस्थिती आवश्यक आहे़.लस देणारा कर्मचारी प्रशिक्षीत असावा. लसीकरण हे संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून करावे. प्रत्येक लाभार्थ्याची लस दिल्यानंतर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक राहील.जिल्ह्यात मान्यता देण्यात आलेल्या खासगी वैद्यकीय संस्थांमध्ये परकार हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, रत्नागिरी, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी, निर्मल बाल रुग्णालय, रत्नागिरी, शिव श्री हॉस्पिटल, रत्नागिरी, चिरायू हॉस्पिटल, रत्नागिरी, शिवतेज शिक्षण संस्था संचालीत योगीता डेंटल महाविद्यालय, खेड, फिनोलेक्स इंडस्ट्रीज असोसिएशन, खेड, यश फाऊंडेशन, रत्नागिरी, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन, खेड, जे.एस. डब्ल्यू.एनर्जी लिमिटेड, जयगड या संस्थांचा समावेश आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button