युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्यांचा सन्मान, कोविड योध्यांचे काम सर्वांसाठी प्रेरणादायी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. १३ : युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना रत्नागिरी आयोजित कोविड योध्यांचा सत्कार समारंभ आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संपन्न झाला.
श्री. सामंत म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे जग संघर्ष करीत असताना कोविड योद्धे म्हणून काम करणाऱ्या या योध्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत अतिशय महत्वपूर्ण असे योगदान दिलेलं आहे.
या दरम्यान कोरोना योध्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे जितके ऋण व्यक्त केले तितके कमी आहेत. या योध्यांनी या काळामध्ये कोविड रुग्णांची सेवा केली आहे. त्यांचं काम आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा युवासेनेचे हा स्तुत्य उपक्रम राबविला असे श्री. सामंत यावेळी म्हणाले.
परिचारिका, डॉक्टर्स, महसू विभाग, आरोग्य विभाग, पोलीस खात्यातील अधिकारी आणि अशा सर्वांनी या कोरोना काळात केलेले काम रत्नागिरी कर कायम लक्षात ठेवतील, अशी भावना श्री. सामंत यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात कोरोना योद्धे, राजरत्न प्रतिष्ठान व आस्था फाऊंडेशन यांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला.
यावेळी, जि. प.उपाध्यक्ष उदय बने, नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, बाबूशेठ म्हाप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बबिता कमलापुरकर , डॉ. मतीन परकार, बिपीन बंदरकर, संजय साळवी, कांचन नागवेकर, तुषार साळवी, अभिजित दुडे, मनोज साळवी, प्रथमेश साळवी, युवराज शेट्ये, रोहित मायनाक, प्रथमेश प्रभू, अथर्व पांगम, प्रसाद कशेळकर व शिवसैनिक उपस्थित होते.
www.konkantoday.com